नूतन विद्या संकूल – वैशिष्ठे

१] तळ मजला अधिक ६ मजली इमारत. एकूण बांधकाम ५२,००० चौरस फुट आहे. या संपूर्ण संकुलात फक्त शैक्षणिक, सांस्कृतिक उपक्रम होतील. कुठल्याही प्रकारचे अशैक्षणिक अथवा व्यावसायिक आस्थापना या वास्तूत होणार नाही.

२] जुन्या इमारतीचा काही भाग ठेवून त्या इमारतीत शाळेचे वर्ग कुठलीही शैक्षणिक गैरसोय न होता, नियमितपणे पुढल्या शैक्षणिक वर्षात सुरळीतपणे चालू राहतील. पूर्व प्राथमिक विभागाचे वर्ग, काही काळ, क्रीडा संकुलाच्या जागेत भरवले जातील.

शाळेच्या पाडलेल्या भागात आणि समोरील मोकळ्या जागेत नवीन इमारतीचे काम सुरु होईल. पहिल्या टप्प्यात ३६,००० चौरस फुटाचे बांधकाम होईल. हि पूर्ण जागा फक्त मराठी माध्यमासाठी असणार आहे. हे काम डिसेंबर २०२० पर्यंत पूर्ण होईल अशी आशा आहे. सध्या संस्थेत कार्यरत असलेल्या विविध विभागातील सर्व वर्ग जून २०२१ च्या नविन शैक्षणिक वर्षापासून शाळेच्या नूतन इमारतीमध्ये सुरु होतील असे नियोजन केले गेले आहे. सर्व भौतिक सोयी- सुविधा, आधुनिक शैक्षणिक साहित्य युक्त, मोकळ्या हवेशीर वर्गखोल्या , दोन सुसज्ज प्रयोगशाळा ,चित्रकला वर्ग, प्रत्येक विभागाचे वेगळे ग्रंथालय तसेच शैक्षणिक आणि सांस्कृतिक उपक्रमासाठी राखीव मोठाल्या खोल्या हे, संस्थेच्या  नूतन वास्तूचे वैशिष्ट्य असणार आहे.. संपूर्ण इमारत पर्यावरण पुरक असेल.

दुसऱ्या टप्प्यात उरलेल्या १६,००० चौरस फुटाचे बांधकाम असणार आहे. भविष्यात कनिष्ठ महाविद्यालय, कला कौशल्य विकास केंद्र, शासकीय धोरणानुसार खुली शाळा असे विविध पर्याय संस्थेने समोर ठेवले आहेत. या दोन्ही टप्प्यांचा एकंदरीत  खर्च अंदाजे १५, कोटी रुपये आहे.

३] सध्या क्रीडा संकुलात कार्यरत असलेली इंगजी माध्यमाच्या शाळेचे विस्तारीकरण पण या प्रकल्पां अंतर्गत योजित केलेले आहे. खर्च अंदाजे रुपये ८ कोटी.

४] क्रीडा ,विज्ञान, सांस्कृतिक केंद्राचे आधुनिकीकरण आणि  विस्तारीकरण हा प्रकल्पाचा अंतिम टप्पा असेल. खर्च अंदाजे रुपये २ कोटी.

संपूर्ण प्रकल्पाचा खर्च २५ कोटी. कालावधी ५ वर्षे.