सरस्वती सेकंडरी स्कूल ही केवळ ठाणे शहरातीलच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील सर्वोत्तम शाळांपैकी एक शाळा म्हणून ओळखली जाते. अर्थातच ही शाळा ठाणे शहराचे भूषण आहे.

इंग्रजी शाळांच्या स्पर्धेला दिमाखाने तोंड देउन शालेय अभ्यासक्रमाबरोबर क्रीडा, सांस्कृतिक आणि सामाजिक क्षेत्रामध्ये शाळेने आघाडी घेतली आहे.

सातत्यापूर्वक गुणवत्तेच्या आधाराने १९७३ सालापासून प्रतिवर्षी शालांत परीक्षेच्या गुणवत्ता यादीत सरस्वती सेकंडरी स्कूलच्या विद्यार्थ्यांचां समावेश आहे. गेल्या पाच वर्षात तीन वेळा शाळेच्या विद्यार्थ्यांनी शालांत परीक्षेत मुंबई विभागीय मंडळात पहिला येण्याचा मान मिळविला आहे.

उच्च शिक्षित आणि कर्तव्यतत्पर शिक्षक वर्ग हे नेहमीच सरस्वती सेकंडरी स्कूलचे वैशिष्टय आहे. विविध शालेय व आंतरशालेय स्पर्धामध्ये विद्यार्थी सहभागी होतात व यश प्राप्त करतात. अभ्यास पूरक उपक्रमातून विध्यार्थांचे व्यक्तिमत्व विविध अंगानी फुलविले जाते.

शालेय अभ्यासक्रमाबरोबर क्रीडा क्षेत्रात शाळेच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धा गाजविल्या आहेत. जिम्नॅस्टिक्स, जलतरण, टेबलटेनिस, बॅडमिंटन या खेळात विध्यार्थ्यांनी सहभागी होऊन विशेष प्राविण्य मिळविले आहे.

सरस्वती विद्या संकुलाच्या नूतन उभारणीची मुहूर्तमेढ ५ मे २०१८ रोजी झाली. त्या अगोदर गेली पन्नास वर्षे दिमाखाने उभी असलेल्या सरस्वती सेकंडरी स्कूल आणि पूर्व प्राथमिक व प्राथमिक विभाग कार्यरत असलेल्या शाळेच्या जुन्या इमारतीने, मावळत्या सूर्याच्या साक्षीने शेवटचा श्वास घेतला. नवीन उभारताना जुन्याला वाट करून द्यावे लागते. निसर्गाचा हा अभिजात न्याय आहे. शाळेचे आजी माजी विद्यार्थी, शिक्षक, पालक हितचिंतक यांनी साश्रू नयनांनी आपल्या लाडक्या शाळेच्या इमारतीला शेवटचा निरोप दिला.