आपण पुढील पैकी एक किंवा अनेक योजनांतून आपला सहभाग घेऊ शकाल…

1) “शिक्षण सुविधा निधी” – शाळेच्या संपूर्ण इमारतीचे बांधकाम पूर्ण होत आले आहे. नूतन इमारतीत अद्यावत शैक्षणिक आणि भौतिक सुविधा पुरविण्याचा संस्थेचा निग्रह आहे. या वर्षी रोटरी क्लब आणि मिलान लॅब्रोटरीज यांच्या सहकार्याने सुसज्ज प्रयोगशाळा विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्याच बरोबर इतर अनेक सुविधा विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्याचा संस्थेचा मानस आहे. या साठी संस्थेने वेगळा निधी बाजूला ठेवला आहे.
सरस्वती मंदिर ट्रस्टचे सर्व माजी विद्यार्थी, आजी माजी शिक्षक / शिक्षकेतर, हितचिंतक यांना या निधी साठी देणगी देण्याचे आवाहन संस्था करीत आहे.

2) शालेय इमारतीतील वर्गखोलीस/वर्गखोल्यांना आपल्या इच्छेनुसार आपल्या प्रिय व्यक्तीचे नाव देणे.
विश्वस्त मंडळाने असा निर्णय घेतला आहे की जी कोणी व्यक्ती/संस्था/गट (बॅच) एकरकमी अथवा २ किंवा ३ समान हप्त्यात रू.१५,००,०००/-(रू.पंधरा लाख मात्र) देणगी म्हणून देतील त्यांना त्यांच्या इच्छेप्रमाणे एका वर्गखोलीस त्यांच्या प्रिय व्यक्तीच्या अथवा बॅचच्या नावाची कायमस्वरूपी पट्टिका लावून संस्थेच्या प्रकल्पास साहाय्य करता येईल. रू. १५,००,०००/- चे पटीत रक्कम देउन आपण एकापेक्षा अधिक वर्गखोल्यांना स्मृतीपट्टिका लावू शकाल. प्रत्येक वर्गाचे क्षेत्रफळ ५५० चौरस फूट असेल.

3) शालेय इमारतीमधील सुमारे सात वर्ग हे ग्रंथालय, २ प्रयोगशाळा, चित्रकला वर्ग, कला वर्ग, शिक्षक कक्ष आणि बैठक कक्ष हे विशेष वर्ग असतील. अशा विशेष वर्ग खोल्यांना आपण आपल्या इच्छेनुसार नामपट्टिका लावू शकाल त्यासाठी एकरकमी अथवा २ किंवा ३ समान
हप्त्यात रू.२५,००,०००/-(रू.पंचवीस लाख मात्र) प्रति वर्गास देणगी देऊन संस्थेस साहाय्य करू शकाल.

4) शालेय इमारतीमधील एका वर्गखोलीस दोन व्यक्तीच्या अथवा दोन गटाच्या (बॅच) स्मृतीपट्टिका लावण्याची योजना संस्थेने स्वीकारलेली असून त्यासाठी प्रति व्यक्ती रू.१०,००,०००/-(रू.दहा लाख मात्र) एकरकमी अथवा २ किंवा ३ समान हप्त्यात देता येतील.

5) आपण रू ५०००/- किंवा त्याच्या पटीत जास्तीत जास्त देणगी देउन संस्थेस साहाय्यभूत ठरू शकाल.

6) काही वेळा आपणास एकरकमी मोठी देणगी देणे शक्य होत नाही पण आपण काही ठरावीक रक्कम प्रतिमहा अथवा प्रतिवर्षी देऊन संस्थेप्रती असलेले आपले प्रेम व विश्वास व्यक्त करू शकाल.

7) सरस्वती मंदिर ट्रस्टला दिलेली देणगी आयकर कायदा कलम 80G प्रमाणे करमुक्त आहे.

8) जर आपण परदेशात नोकरी/ व्यवसायाचे निमित्ताने राहात असाल तर आपण आपली देणगी परकीय चलनाने देऊ शकाल. त्यासाठी आवश्यक असणारे FCRA प्रमाणपत्र संस्थेस प्राप्त झालेले आहे.

9) आपण निधिसंकलन समितीचे सदस्य म्हणून निधिसंकलनास मदत करू शकाल. जर आपण निधिसंकलन समितीचे सदस्य होउन कार्य करू इच्छित असाल तर कृपया विश्वस्त सरस्वती मंदिर ट्रस्ट यांचे बरोबर संपर्क साधावा.

शालेय विकासासाठी देणगी धनादेशाद्वारे स्वीकारली जाईल : सरस्वती मंदिर ट्रस्ट

(80G अंतर्गत आयकर मान्यता क्र.ठाणे/आ.आ-||/80G/२५२/२००८-०९/१८४५ दि.१९-०९-२००८)

बँक तपशील : भारतीय चलन –

TJSB Sahakari Bank Ltd , Branch : Naupada,Thane
खाते क्र. 003110100013685
IFSC Code  : TJSB0000003

परकीय चलन –

SBI
खाते क्र. 40108707271 (FCRA Current Account)
IFSC Code  : SBIN0000691

Branch Code: 00691