सरस्वतीय सूत्र

नेटकेपणा, प्रामाणिकपणा आणि सर्वोत्तमाचा ध्यास

सरस्वतीय व्रत (Mission)

विद्यार्थ्यांना सर्वार्थाने सबल, सक्षम आणि समृद्ध बनविण्यासाठी उच्चतम गुणवत्तेची शैक्षणिक व्यवस्था निर्माण करणे.

सरस्वतीय आकांक्षा (Vision)

२०३० सालापर्यत सर्वार्थाने उच्चतम शिक्षण देणारी जागतिक दर्जाची शिक्षण संस्था होणे.

सरस्वती मंदिर ट्रस्ट – एक वाहता प्रवाह

सरस्वती मंदिर ट्रस्ट ही ठाण्यातील नामांकित शिक्षण संस्था असून जवळ जवळ सात दशकांची शैक्षणिक, सांस्कृतिक, विज्ञान, क्रीडा क्षेत्रामधील देदीप्यमान, उज्ज्वल परंपरा संस्थेस लाभली आहे. शाळेची स्थापना संस्थापिका विश्वस्त श्रीमती विमलाताई कर्वे यांनी सहकारी विश्वस्त डॉ. चि.श्री. कर्वे व श्री. ग ना. गाजरे यांच्या सहकार्याने १९५२ साली केली.

थोडक्यात पण महत्वाचे

  • सरस्वती मंदिर ट्रस्ट स्थापना ६ जून १९५२

  • संस्थापक विश्वस्त डॉ. चिं. श्री. कर्वे, श्रीमती विमलाताई कर्वे, श्री. ग.ना.गाजरे

  • सरस्वती मंदिर ट्रस्ट, प्राथमिक विभाग स्थापना ६ जून १९५२

  • सरस्वती मंदिर ट्रस्ट, शिशु विभाग – स्थापना जून १९५५

  • स्वत:च्या मालकीची वास्तू जून १९६५

  • सरस्वती सेकंडरी स्कूल स्थापना जून १९६६

  • गुणवत्ता यादीत झळकलेला पहिला विद्यार्थी श्रीधर बाम १९७३

  • मुंबई विभागीय मंडळात प्रथम क्रमांकाने उतीर्ण हर्षवर्धन सुभेदार १९९०

  • माध्यमिक विभाग मुख्याध्यापक श्री.अ.गो.टिळक यांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार १९९५

  • सरस्वती क्रीडा – विज्ञान – सांस्कृतिक संकुलाची स्थापना जून १९९८

  • प्रज्ञा भाषा केंद्र – २०११

  • इंग्रजी माध्यम शाळेची स्थापना – २०१५

  • नवीन इमारत भूमी पूजन – ५ मे २०१८ डॉ. अनिलजी काकोडकर यांच्या शुभहस्ते

 

विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी अभ्यास अभ्यासेतर आणि अभ्यासानुवर्ती उपक्रम

  • ५ वी व ८वी शिष्यवृत्ती वर्ग

  • बाह्य परीक्षा वर्ग

  • होमी भाभा बाल वैज्ञानिक परीक्षा वर्ग

  • राष्ट्रीय बाल विज्ञान परिषद

  • राष्ट्रीय प्रज्ञा शोध वर्ग

  • चित्रकला परीक्षा वर्ग

  • ग्राहक मंच, निसर्ग मंडळ, पर्यावरणमंच

  • इंग्रजी संभाषण वर्ग

  • कब, बुलबुल, स्काऊट आणि गाईड पथक

  • सरस्वती छात्र सेना

  • विद्यार्थी समुपदेशन

  • रस्तासुरक्षा पथक

  • अप्रगत विद्यार्थ्यांसाठी विशेष मार्गदर्शन

  • शिकवणी मुक्त शाळा अभियान

सरस्वती मंदिर ट्रस्ट ठाणे – विशेष मानदंड

शाळेचे माजी मुख्याध्यापक श्री. अशोकजी टिळक यांना राष्ट्रपती पुरस्काराने गौरविले गेले आहे.शाळेचे माजी विद्यार्थी आज विविध क्षेत्रात आपल्या ज्ञानाचा ठसा उमटवत आहेत. त्यातील अनेक माजी विद्यार्थी शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, भारतीय सेनादल आणि राजकीय क्षेत्रात आज उच्च पदावर आहेत.

त्यातील काही प्रमुख व्यक्तिमत्वे खालील प्रमाणे :

श्री. नरेशजी म्हस्के : ठाणे महानगराचे माजी महापौर आणि प्रथम नागरिक.

डॉ. अमोल दिघे: डॉ भटनागर पुरस्कार विजेते ज्येष्ठ शास्त्रज्ञ

श्री. ऋषिकेश मोडक: भारतीय सनदी अधिकारी. IAS.

श्री. संकेत काळे : भारतीय सनदी अधिकारी, IRS

मेजर अनुपम साळवे : भारतीय सेना दल

संस्थेच्या सरस्वती सेकंडरी स्कूल या माध्यमिक शाळेचे ‘शेकडो विद्यार्थी’ १० वी शालांत परीक्षेत गुणवत्ता यादीत आलेले आहेत. यापैकी काहींनी मुंबई विभागात प्रथम अथवा व्दितीय  क्रमांक पटकावण्याचा पराक्रम केला आहे. याबरोबरच मुलींमध्ये प्रथम क्रमांक आणि बहुजन समाजात प्रथम क्रमांक मिळविण्याची कामगिरी अनेकवेळा केली आहे. क्रीडा केंद्राच्या विविध खेळांमधून अनेक खेळाडू आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय स्तरावर चमकत आहेत. संस्थेचे तीन माजी विद्यार्थी आणि तीन क्रीडा शिक्षक “छत्रपती पुरस्काराने” गौरवले गेले आहेत.

संस्थेची मराठी माध्यमाची नूतन विकसित इमारत वापरास उपलब्ध होणे आणि करोना महामारीची साथ सुरु होणे हा एक दैवदुर्विलासी योगायोग. नूतन इमारतीचा बहुतांश भाग हा कार्यरत झाला असून या वर्षाच्या अखेरी पर्यंत संपूर्ण इमारत परिपूर्ण झाली असेल. ही नूतन इमारत अनेक अडचणीना तोंड देऊन, स्वबळावर तीन वर्षाच्या आत पूर्ण करणे हे सर्व सरस्वतीयांना निश्चितच  अभिमानास्पद आणि गौरवास्पद आहे.

या इमारतीवर बारा कोटी रुपये खर्च झाले असून अजून चार कोटी खर्च होणे अपेक्षित आहे. नूतन इमारतीच्या बांधकामाचे हे काम पूर्ण होत असतानाच , शैक्षणिक साधने, साहित्य आणि सुविधा यावरील खर्चाचे गणित सोडवणे हे संस्थेसमोरील आव्हान आहे. करोना पश्चात  काळातील नव्या आणि बदलत्या शैक्षणिक संकल्पनां मुळे हा प्रश्न अधिक कठीण झाला आहे. पारंपरिक  शैक्षणिक सुविधां बरोबर, नजीकच्या भविष्य काळातील तंत्रज्ञाननिष्ठ शिक्षण सुविधा विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देणे ही काळाची गरज आहे.

पुस्तकी शिक्षणा बरोबर विद्यार्थ्यांचा कला- कौशल्य गुणांचा विकास हा पण शालेय शिक्षणाचा अविभाज्य भाग झाला आहे. त्याच बरोबर नवीन शैक्षणिक कायद्यात माध्यमिक शिक्षणाची कक्षा १२ वीपर्यंत वाढवली असल्याने नव्याने इ. ११वी -१२ वी चे वर्ग सुरु करणे हे अपरिहार्य झाले आहे. या वर्गांची शैक्षणिक सुविधा हा संपूर्णपणे नव्याने विषय असणार आहे.

सरस्वती मंदिर ट्रस्ट, ठाणे सात दशकांची शैक्षणिक, सांस्कृतिक, विज्ञान व क्रीडा क्षेत्रातील अखंड देदीप्यमान आणि उज्ज्वल वाटचाल पूर्ण केली आहे. या महत्वाच्या टप्प्यावर बदलत्या शैक्षणिक आणि सामाजिक आव्हानांना सामोरे जाण्यासाठी विद्यमान विश्वस्त मंडळ सज्ज आहे.

पुढील वीस वर्षाचा विचार करता विश्वस्त मंडळाला, जागतिकीकरणाच्या आणि करोनाच्या पार्श्वभूमीवर, झपाट्याने बदलत जाणाऱ्या सर्वच क्षेत्रांतील बदलांचा विचार करणे आवश्यक वाटत आहे . केवळ ठाणे शहराचा विचार करता आर्थिक व सामाजिक स्तरावर आमुलाग्र बदल होत आहेत. शिक्षण क्षेत्रात अध्ययन आणि अध्यापनाची नवनवी तंत्रे व साधन सुविधा स्थिरावत आहेत. विशेषत: भारत सरकारच्या नवीन शैक्षणिक धोरणाने देशातील शिक्षण क्षेत्रात नवीन आव्हाने निर्माण होत  आहेत, त्याच बरोबर नवीन संधी सुद्धा उपलब्ध करून दिल्या आहेत. नवीन युगात,आपले विद्यार्थी, सर्वार्थी सक्षम, समृद्ध आणि आत्मनिर्भय होण्यासाठी संस्था कटिबद्ध आहे.

सुरेन्द्र दिघे

कार्यकारी विश्वस्त- सरस्वती मंदिर ट्रस्ट

 

संस्थेच्या भावी योजना

·       कनिष्ठ महाविद्यालय – कला – वाणिज्य – विज्ञान

·       भाषा प्रयोग केंद्र

·       मराठीसह इंग्रजी माध्यमाची अद्ययावत शाळा