नाव - श्रीमती रती नरेंद्र भोसेकर
शिक्षण - M. Com.

SDG Academy (Harvard and New York University designed) online course for Early Childhood Development for sustainable Development.

 • बालशिक्षण क्षेत्रात १९ वर्ष कार्यरत आहे.
 • सरस्वती मंदिर ट्रस्ट, या ठाण्यातील नावाजलेल्या संस्थेच्या पूर्व प्राथमिक विभाग ठाणे येथे २०१४ पासून मुख्याध्यापिका पद भूषवित आहे. त्याआधी २००० पासून त्याच विभागामध्ये शिक्षिका म्हणून कार्य बजावले.
 • NCERT, Delhi तर्फे घेण्यात येणा-या All India competition on Innovative Practices in Education For Schools and Educational Institutes  या स्पर्धेमधे २०१५-१६चे राष्ट्रीय पारितोषिकमिळाले आहे.
 • Ministry Of Human Resource and Development, Govt of India तर्फे आयोजित National Workshop on Education मधे Experiential Learning या विषयावरील चर्चासत्रात सहभाग आणि पूर्व प्राथमिक स्थरावर लेखनपूर्व व वाचनपूर्व तया-यावर आधारित प्रकल्पाचे सादरीकरण केले.
 • लोकसत्ताच्या चतुरंग पुरवणीसाठी ‘शिकु आनंदे’ नावाचे सदर लेखन केले. या सदराचा मुख्य उद्देश हा बालशिक्षणात कार्यरत असणा-यांना वर्गात राबवता येतील अशा मुलांशी निगडित उपक्रमांची माहिती करुन देणे हा होता.
 • शिक्षणवेध या शिक्षकप्रेमींसाठी महाराष्ट्रभर प्रसारित होणा-या मासिकाच्या सप्टेंबर महिन्यातील अंकासाठी अथिती संपादक पद भूषविले. हा अंक पूर्णपणे शाळेत झालेल्या प्रकल्पावर काढला होता.
 • प्रथम या एन जी ओ साठी लहान व मोठ्या शिशुचा संपूर्ण अभ्यासक्रम तयार करण्याचे काम केले आहे.
 •  प्रथमसाठीच पूर्व प्राथमिक विभागातील मुक्तखेळावर आधारित एका लघुफिल्मच्या स्किटच्या लेखनाचे काम केले.
 • अनेक शाळांमधून व संस्थामधे पूर्व प्राथमिक शिक्षकांसाठी पूर्व प्राथमिकमधील खेळपध्दतीविषयी व त्यात राबवण्यात येणा-या उपक्रमांविषयी प्रशिक्षण चालू असते.
 • अस्मिता वाहिनी करीता बालनाट्य लेखन, ललितलेख वाचन, मुलाखत आदी कार्यक्रमात सहभाग
 • श्री हनुमान व्यायाम शाळा या ठाण्यातील नावाजलेल्या संस्थेशी, बालभवन या ३ ते ७ वयोगटातील मुलांसाठी सुरु असलेल्या स्थूल स्नायूविकासाधारित खेळ उपक्रमाच्या, मार्गदर्शिका म्हणून २००९ पासून निगडित आहे.
 • राष्ट्रिय व राज्यस्तरीय बालशिक्षण परिषदांमधे सहभाग व पेपर सादरीकरण
गौरव व सन्मान -
 • बालशिक्षण क्षेत्रात कामाची सुरुवात सरस्वती मंदिर ट्रस्ट या संस्थेत शिक्षिका या पेशाने केली. मुलांबरोबर केलेल्या विविध आणि सातत्यपूर्ण उपक्रमांमुळे अल्पावधीतच संस्थेतर्फे उपक्रमशील शिक्षिका असा गौरव केला गेला.
 • ठाणे वैभव नवदुर्गा सक्षम महिला पुरस्कार – २००९ मध्ये मिळाला.
 • ठाणे, शहरी व ग्रामिण भागात भरीव कार्य करणा-या जागर फाऊंडेशन तर्फे, शिक्षणक्षेत्रामधे भरीव कामगिरी केल्याबद्दल ‘ज्ञानभूषण’ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
सामाजिक कार्य –
 • मध्यप्रदेशातील निमार अभ्युदया रुरल मॅनेजमेंट ऍंड डेव्हलपमेंट असोसिएशन च्या शिक्षकांसाठी प्रशिक्षणाचे काम सुरु आहे.
 • पालघर जिल्ह्यातील भोपोली येथील आंगणवाडी सेविकांसाठी प्रशिक्षणाचे काम कले आहे.