आज सकाळी 10.30 वाजता नूतन इमारत प्रकल्पाच्या जागी काळ कुपिका इमारतीच्या पायाखाली खोल भूमीला अर्पण करण्यात आली. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ. विजय जोशी, हे होते. या प्रसंगी संस्थेचे विश्वस्त सुरेंद्र दिघे, पुरुषोत्तम आगवण, विकास दामले, अनुराधा आपटे,व्यवस्थापक दीपक सहानी, शिक्षक सुरेश जंगले उपस्थित होते. आज या काळ कुपिकेमध्ये संस्थेचा इतिहास, सर्व आजी माजी,मुख्याध्यापक, शिक्षक यांच्या नावाची यादी ठेवलेली आहे. तसेच 7 ते 10 एप्रिल दरम्यात,जुन्या इमारतीला निरोप देण्यास आलेल्या व नावे नोंदविलेल्या सर्व म्हणजे जवळपास 1200 माजी विद्यार्थ्यांची यादी,नाव आणि मोबाईल क्रमांक सहित टाकलेली आहेत.
ही कल्पना यशस्वी करण्यासाठी, माजी विद्यार्थी, अतुल जोशी, व्यवस्थापक सहानी, मुख्याध्यापक शिंदेसर आणि विश्वस्त आगवण सर यांनी खूप मेहनत घेतली होती.

काळ कुपिका - ७ ऑक्टोबर २०१८

सरस्वती विद्या संकुलाच्या नूतन उभारणीची मुहूर्तमेढ ५ मे २०१८ रोजी झाली. या कार्यक्रमाची काही छायाचित्रे….

BhoomiPoojan